कारखान्यातील टाकावु प्लास्टिक खाल्याने गुरे दगावली; स्थानिकांची मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

खोपोली : समाधान दिसले
खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत कारखानदारी आल्याने प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. साजगाव, ढेकू, आत्करगाव, होनाड परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. यातील आत्करगाव गावच्या हददीत एका कारखान्याने कंपाऊंड न करता त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत केमिकल मिश्रीत प्लास्टिक टाकल्याने सदरचे प्लास्टिक परिसरातील दोन गुरांनी खाल्ल्याने बेशुद्ध होऊन मरण पावल्याची घटना रविवारी दुपारी घडल्याने याबाबत येथील नागरिकांनी या कंपनी मालकाच्या बेपरर्वाईचा संताप व्यक्त करीत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्राम पंचायत हददीत अग्रवाल ब्रदर्स नावाचा कारखाना असून या कंपनीच्या मालकीच्या जागेत कारखान्यात उत्पादनासाठी वापरलेले केमिकलने माकलेले टाकाऊ प्लास्टिक टाकून दिल्याने हे प्लास्टिक भूक भागविण्यासाठी गुरांची खाल्ल्याने दोन गुरांना गुंगी येऊन जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून या विरोधात या कारखान्याचे मालक सुनील रमेश अग्रवाल यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर या मालकावर कडक कायदेशीर कारवाई करावी व गुरे मालकांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत