कारचा अपघात; एक ठार, तीन जखमी

मुंबई : रायगड माझा वृत्त

गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कर्नाळा खिंडीत एसटी बस आणि कारचा अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघातातील जखमी व मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत