कारच्या धडकेत रस्त्यालगत चालणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने कारने रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. याच तिचा मृत्यू झाला. अर्टना पोर्टे असे मृत तरुणीचे नाव आहे. जो पर्यंत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही, तो पर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघांपैकी ३ आरोपींना अटक केली आहे.

काल (शुक्रवार) रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला आहे. कारमध्ये एकूण ४ तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. चुनाभट्टी परिसरात काल रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. काल रात्री दोन तरुणीबाहेर निघाल्या असता त्यांची मैत्रिण अर्चना ही देखील कंटाळा आला म्हणून सहज त्यांच्यासोबत बाहेर निघाली होती. ती दोघींच्या काहिशी पुढे चालत होते. काही कळण्याच्या आत मागून भरधाव वेगात कार आली आणि अर्चनाला धडक दिली आणि कार तशीच पुढे निघून गेली. यात अर्चनाता मृत्यू झाला.

या घटनेनंतर सोबतच्या दोन मुलींना मोठा धक्का बसला असून त्यातील एक तरुणी अजूनही धक्क्यातून सावरलेली नाही.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत