कारमध्ये बलात्काराचा प्रयत्न

मुंबई : रायगड माझा वृत्त

नामांकित कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखूवन कारमध्ये तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी यलो गेट परिसरात घडला. तरुणीचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणीवर जबरदस्ती करणारा नराधम पकडला गेला. कलिम खान असे त्याचे नाव असून त्याच्यावर यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गिरगावात राहणारी २३ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात असताना, एका मैत्रिणीने तिला एका कंपनीत नोकरी असल्याचे सांगून कलिम याचा संपर्क दिला. कलिमने तिला यलो गेट परिसरात भेटण्यास बोलाविले व कार्यालयात नेत असल्याचे सांगून तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. कलिम याने कार निर्जनस्थळी उभी करून तिच्याशी जबरदस्ती केली. तरुणीने हिंमतीने प्रतिकार करत स्वत:ची सुटका करून घेतली. याचवेळी यलोगेट पोलिसांची व्हॅन तेथून जाताना दिसताच, तरुणीने आरडाओरड करून मदत मागितली. पोलिस शिपाई प्रशांत देशमुख आणि महिला पोलिस शिपाई पुष्पा गावित यांनी पाठलाग करून कलिम याला पकडले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत