कार्तिकी एकादशी निमित्त ‘माऊली’ मधील ‘माझी पंढरीची माय’ गाणे प्रदर्शित

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित ‘माऊली’ या चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील ‘माऊली माऊली’ हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हे गाणे रितेश देशमुख, अभिनेत्री सैयामी खेर, संगीतकार व गायक अजय-अतुल यांच्यावर चित्रित झाले आहे. गाण्यामधील दृश्य व सिनेमेटॉग्राफी आकर्षित करणारी असून त्याला अजय-अतुल यांच्या आवाजाची व संगीताची साथ लाभली आहे. रितेश देशमुखने आपल्या फेसबुक अकाऊंटद्वारे हे ‘माऊली’मधील हे गाणे शेअर केले आहे व त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!!’

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा टीझर अभिनेता शाहरूख खान याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. तर आज हे गाणे अक्षय कुमारनेही आपल्या फेसबुक अकाऊंचवरून शेअर केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत