कालव्यात बस कोसळून ५ मुलांसह २५ जण ठार

बंगळुरु :रायगड माझा ऑनलाईन 

 

दक्षिण कर्नाटकातील मांड्या गावाजवळच्या कालव्यात बस कोसळून जवळपास २५ जण ठार झाले आहेत. यामध्ये ५ छोट्या मुलांचाही समावेश आहे. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनूसार मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्याता आहे.

बंगळुरु पासून १०५ किमी. अंतारावर असलेल्या दक्षिण कर्नाटकातील मांड्या गावाजवळच्या कालव्यात एक खासगी बस कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कालवा खोल नसल्याने बसची दरवाज्याची बाजू कालव्याच्या तळाला टेकली. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना बसमधून बाहेर येता आले नाही.

कालव्याच्या जवळच काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही प्रवाशांना बुडण्यापासून वाचवले. स्थानिकांनी दोरी लावून कालव्यात पडलेली बस काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत