काळवीट शिकार प्रकरण : सलमानच्या शिक्षेवर १७ जुलैला होणार सुनावणी

जोधपूर: रायगड माझा

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरील खटल्यावर येत्या १७ जुलैपासून जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. काळवीट शिकार प्रकरणी सीजेएम कोर्टाने सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात सलमानने जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी करताना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रकुमार सोनगरा यांनी या प्रकरणावर येत्या १७ जुलैपासून सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला सीजेएम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं होतं. शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत