काळे कपडे घातलेल्यांना मोदींच्या सभेत ‘नो एंट्री’

कल्याण : रायगड माझा वृत्त 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेला काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांना अथवा नागरिकांना नो एंट्री आहे. त्यामुळे काळे कपडे परिधान केलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांनी बाहेरच थांबण्यास सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काळे कपडे परिधान केलेल्या नागरिकांना सभेस्थळी येण्यास मनाई केली आहे.

मोदींच्या सभेसाठी कल्याणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने कल्याणला पोलीस छावणीचे स्वरूप लाभले आहे. सभेला जाताना प्रत्येकाची मेटल डिटेक्टर मधून  कसून तपासणी करण्यात येत आहे. सभेस्थळी महिला आणि पुरुषांसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच  इंकपेन आणि डिजिटल घड्याळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईलला परवानगी देण्यात आली असली तरी नेटवर्क जॅमर बसविण्यात आले आहेत, त्यामुळे इंटरनेट सेवा बंद आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत