काश्मिरात ५ दहशतवाद्यांचा खात्मा

‘ऑपरेशन ऑल आउट’!; बुरहान वानी गँग संपुष्टात

श्रीनगर : रायगड माझा वृत्त

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ‘मिशन ऑल आउट’ला आज मोठं यश मिळालं. या चकमकीत हिजबुलचा मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातल्याने दहशतवादी बुरहान वानीची गँग संपुष्टात आली असल्याचं बोललं जात आहे. चकमकीत सद्दाम पाडरसह डॉक्टर मुहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. परिसरात शोधमोहिम अजूनही सुरू असल्याची माहिती आहे.

शोपियांमधील बडीगाम क्षेत्रात सकाळी भारतीय जवानांकडून शोधमोहिम सुरू असतानाच सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरूवात झाली . या चकमकीत एक पोलीस अधिकारी आणि एक जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे. चकमक सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांना जवानांनी शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच राहिल्याने सुरक्षा दलानं अत्यंत नेटानं किल्ला लढवत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

‘ऑपरेशन ऑल आउट’द्वारे लष्करानं यावर्षी एकूण ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत