काश्मीरमधील कुपवाडामध्ये चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: रायगड माझा वृत्त

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही चकमक तात्पुरती थांबली असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

कुपवाडा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती काल रात्री सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी या परिसराची नाकेबंदी करण्यात आली. चहुबाजूंनी दहशतवाद्यांना घेरण्यात आले. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. चहूकडून घेरलो गेल्याचं कळताच बिथरलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलानंही चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. मात्र, याच परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती असून त्यांचा शोध सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी शोपियामध्येही अशाच प्रकारे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं. पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी सैन्याने दोन दिवसांत ३० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत