काश्मीर: कुलगाम चकमकीत २ अतिरेकी ठार

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

दक्षिण काश्मीरमधील कुलगामजवळील रेडवानी गावात सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर एक जवान शहीद झाला आहे. या परिसरात इतर दहशतवाद्यांचाही शोध सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेडवानी गावातील एका घरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्रीच सीआरपीएफने परिसराला घेरले आणि गावात संचारबंदी लादली. मध्यरात्री दहशतवादी लपले होते त्या घराजवळ सीआरपीएफचे जवान जात असताना अचानक दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला जवानांनी त्याला कडवे प्रत्युत्तर दिले. पहाटेच्या सुमारास घरात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान त्राल परिसरातही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत