काश्मीर: लष्कराने केला ४ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : रायगड माझा ऑनलाईन 

प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. आज सकाळी पुलवामामध्ये दोन तर श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं आहे.

पुलवामामध्ये आज पहाटे दोन दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. काही तासांच्या चकमकीनंतर दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं असलं तरी पाच जवान या चकमकीत जखमी झाले आहेत.

दुसरीकडे श्रीनगरच्या खोनमोह परिसरात एका सरकारी शाळेच्या इमारतीमागे दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्याने संयुक्त ऑपरेशन करत या दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीरमधून दहशतवाद कायमचा संपवण्यासाठी सैन्याने चंग बांधला असून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत