काश्मीर सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या पत्नीची घरासाठी लढाई,बांधकाम व्यावसायिकाने केली २४ लाखाची फसवणूक

उरण : राजकुमार भगत

पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या सीमेवर शत्रूंंशी लढणाऱ्या केळवणे गावातील सत्यवान पाटील या जवानाची एका बांधकाम व्यावसायिकाने घराच्या नावाखाली २१ लाखाची फसवणूक केली आहे.फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिका विरोधात पत्नीने पोलीसात दाद मागुनही न्याय मिळाली नसल्याची खंत पत्रकारांशी बोलताना साआश्रू नयनानी दिली.

केळवणे-उरण गावातील सत्यवान पाटील हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.केळवणे येथेच त्यांचे कुटुंबीयांसोबत राहात आहेत.त्यांनी पनवेल येथे जमीन घेऊन घर बांधण्याचे काम सुरु केले आहे. काश्मीरमधील सीमेवर तैनात असल्याने या जवानाने घर बांधणीचे काम एका बांधकाम व्यावसायिकाकडे सोपविले आहे.घर बांधणीसाठी बांधकाम व्यावसायिकासोबत २४ लाख ९१ हजार ५०० रूपायांचा कागदपत्री करारही करण्यात आला आहे.मात्र घराचे काम अर्धवट असतानाही पत्नीच्या अज्ञानाचा फायदा घेत घराच्या बांधकामाच्या नावाखाली २१ लाख ३६ हजार ५०० रुपये घेतले आहेत. यासाठी बँकेतून १० लाखाचे कर्जही घेतले आहे. मात्र घराचे बांधकाम अपुर्ण असताना बांधकाम व्यावसायिक कामासाठी आणखी पैशांंची मागणी करु लागला आहे. मात्र घराचे काम पुर्ण झाल्याखेरीज आणखी पैसे देण्यास नकार देताच बांधकाम व्यावसायिकांनी काम करणेच बंद केल्याची माहिती जवानाची पत्नी अश्विनी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी पैसे घेऊनही घराचे बांधकाम करणे बंद केल्याने अखेर जवानाची पत्नी अश्विनी पाटील यांनी पोलीसात धाव घेतली.पोलिस, डीसीपी,तहसीलदार यांच्याशी भेटी घेऊनही जवानाच्या पत्नीला अद्यापही न्याय मिळाला नसल्याची खंत जवानाची पत्नी अश्विनी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सत्यवान पाटील शहीद झाल्याची चुकीची अफवा पसरली होती.या धक्क्यातून सावरण्याची संधी मिळण्याआधीच काश्मीरच्या सीमेवर शत्रूंंशी सत्यवान पाटील लढत आहेत.मात्र दुसरीकडे या जवानाची पत्नी एका बांधकाम व्यावसायिकाने घराच्या नावाखाली केलेल्या फसवणूकी विरोधात आणि आपल्या घराच्या हक्कासाठी लढा देत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत