किल्ले रायगडावर गुंजला शिवराज्याभिषेकाचा गजर!

महाड : सिद्धांत कारेकर 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर ढोल ताश्याचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमींनी कालपासूनच हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे या उत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी शिव प्रतिमेची पूजा केली. वेगवेगळ्या फुलांनी नटलेल्या मेगडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालून राज दरबारापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. शिवराज्याभिषेकाचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी रायगडावरती जनसागर लोटला होता. कोल्हापूचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा सोहळा पार पडला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत