कुंभ मेळ्यात आग; बिहारचे राज्यपाल थोडक्यात वाचले!

प्रयागराज : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for कुंभ मेळ्यात आग; बिहारचे राज्यपाल थोडक्यात वाचले!

प्रयागराजमधील सेक्टर २० जवळच्या त्रिवेणी टेंट सिटीत पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. राज्यपालांचा मुक्काम असलेल्या कॅम्पमध्येच आग लागल्यानं सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. राज्यपाल टंडन हे त्यावेळी झोपेत होते. सुरक्षा रक्षकांनी तातडीनं हालचाली करून त्यांना सर्किट हाउसवर हलवले. मात्र, त्यांच्याकडील अनेक वस्तू आगीत खाक झाल्या. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कुंभ मेळ्याच्या ठिकाणी लागलेली ही तिसरी मोठी आग आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर परिसरात आग लागली होती. त्यात दोन तंबू जळाले होते. तर, १५ जानेवारी रोजी दिगंबर आखाड्याच्या तंबूत सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळं लागलेल्या आगीत दहा तंबू जळून खाक झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत