कुटुंबकलहाने रक्ताळली नाती: हत्यांच्या एकापाठोपाठ एक घटनांनी महाराष्ट्र हादरला…

आई-पत्नीवर चाकूने हल्ला, स्वत:वरही वार केला, पत्नीचा मृत्यू

सातारा : रायगड माझा 

मुलाने आई व पत्नीवर चाकूने वार करून स्वत:लाही गंभीर जखमी करून घेतल्याची घटना सातारा जिल्ह्यातील वराडे गावात शनिवारी घडली. पत्नीचा मृत्यू, तर आई व मुलगा गंभीर जखमी आहेत. सागर घोरपडे (४०) असे पतीचे नाव आहे. पत्नी मोहिनीचा (३२) मृत्यू, आई कल्पना (५८) गंभीर जखमी आहेत.सागर, मोहिनी, आई कल्पना यांच्यात शुक्रवारी कौटुंबिक कारणावरून वाद झाला हाेता. त्याच्या संतापाने त्याने टोकाचे पाऊल उचलले.सागरने आई आणि पत्नीला चाकूने अनेकदा भोसकले. नंतर त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेतले. कल्पना यांच्या आक्रोशामुळे शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली.

 

दुसरी घटना परभणी येथील आहे.  पती आणि पत्नीचे एकमेकांवर वार, पती गंभीर

शुक्रवारी पहाटे भांडणानंतर पती ज्ञानेश्वर झरकर व पत्नी गीता यांनी एकमेकांवर धारदार वस्तूने हल्ला केला. त्यात दोघेही जखमी झाले. पती गंभीर आहे. गीताच्या भावाच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वरवर गुन्हा दाखल झाला. दांपत्याने महिनाभरापूर्वी निमंत्रण पत्रिका छापून लग्नाचा २५ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला होता.

कारण

ज्ञानेश्वर व गीता यांच्यात शुक्रवारी पहाटे अज्ञात कारणामुळे मोठे खटके उडाले. त्यातून वाद वाढल्यानंतर दोघेही चवताळून एकमेकांच्या अंगावर धावले. पोलिसांनी चौकशी करूनही वादाचे कारण कळले नाही.

क्रौर्य

वार वर्मी बसल्याने ज्ञानेश्वर बेशुद्ध हाेऊन पडले. काही वेळेनंतर ही घटना त्यांच्या मुलांच्या लक्षात आली. त्यांनी मित्रांच्या साह्याने दरवाजे तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला, तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत