कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचं इम्रान खानचं पाकच्या नागरिकांना आवाहन

इस्लामाबाद : रायगड माझा वृत्त 

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरुन गेलं आहे. हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहा असं आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातल्या जनतेला केलं आहे.

भारताच्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्यावरचा दबाव वाढतो आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खानने हे आवाहन केलंय. बुधवारी पाकिस्तानात सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत सर्व पक्षांना माहिती देण्यात येणार आहे.

पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील मानशेरा जिल्ह्यात बालाकोट हे शहर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचं गृहराज्यही खैबर पख्तूनख्वाच आहे. रिपोट्सनुसार २००१ दरम्याच्या काळात जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अजहर याच भागात राहायचा. इथूनच तो जैश-ए-मोहम्मद संघटना चालवतो आणि इथूनच लॉन्चपॅड चालवले जातात.

भारतीय वायुदलाने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अल्फा ३ कंट्रोल रूमला नेस्तनाबूत केले. २००१ मध्ये इंटेलिजन्स एजन्सींनी सांगितलं होतं की, बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद रॅलाही करतं. बालाकोट येथील बेसयान चौक येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षणही देण्यात येतं. असंही म्हटलं जातं की, हा तोच परिसर आहे जिथे अमेरिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दहशतवादी कारवाईचं प्लॅनिंग केलं होतं.

हा एअर स्ट्राइक पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यात करण्यात आला. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर हल्ला केला. यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानमध्ये बसून दहशतवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत