कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू ,परिसरात खळबळ

कुर्ला : रायगड माझा ऑनलाईन 

कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू

मुंबईत कुर्ला परिसरात मंगळवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडलीय. कुर्ल्याच्या हलाल पूल परिसरात हो गोळीबार झालाय. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच व्ही बी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ही गँगवॉरची घटना असल्याचं सांगण्यात येतंय. या भागात मोकळा वावर असणाऱ्या कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर हा गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजल्याच्या सुमारास दोन बाईकस्वारांनी समोरून बिल्लावर गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले.

विनोबा भावे नगर पोलिसांनी गंभीर अवस्थेतील बिल्लाला जवळच्याच सायन रुग्णालयात हलवलं. परंतु, उपचारादरम्यान बिल्लाचा मृत्यू झाला. बिल्ला सध्या जामिनावर तुरुंगाच्या बाहेर होता.

बिल्लावर त्याचाच सावत्र भाऊ विनोद पवार यानं जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर विनोदनं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसर्मपण केलं आहे. सावत्र भावाचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास विनोद पवारने कुर्ल्याच्या हलाव पुलावर जानू पवारला गाठलं आणि त्याच्यावर तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात जानू पवार याचा मृत्यू झाला.

पुराव्यांसाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत मात्र दहशतीचं वातावरण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत