कुर्ल्यात ६ लाखांच्या एमडीसह पेडलर जाळ्यात

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for arrest

कुर्ला परिसरातील नशेबाजांना एमडीचा साठा घेऊन आलेल्या एका पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने रंगेहाथ पकडले. त्या पेडलरकडे तब्बल 150 ग्रॅम वजनाचा व सहा लाख किमतीचा एमडीचा साठा सापडला.

कुर्ला पश्चिमेकडील सर्वेश्वर मंदिर परिसरात एक ड्रग्ज पेडलर एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक शेळके, उपनिरीक्षक चारू चव्हाण व पथकाने त्या परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार हसन अली सुभान अली शेख (34) हा तरुण तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. तेव्हा त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कपडय़ाच्या खिशात 150 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. हा एमडी त्याने कुठून आणला व कोणाला विकणार होता याचा तपास सुरू असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत