कुलाब्यातील प्रतिष्ठित शाळेतून पाच मुली बेपत्ता

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या प्रतिष्ठित शाळेतून पाच मुली बेपत्ता झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास या मुलींची शाळा सुटली. काल या शाळेचे ओपन हाऊस होते. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या आहेत.

या मुलींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने या मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्या कुठे गेल्या त्यांचे काय झाले? हे अद्याप समजू शकलेले नाही तसेच शाळेचे नावही कळू शकलेले नाही. पोलिसांनी या मुलींचा शोध सुरू केला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या मुलींचे पालक शाळेत होते.

तसेच इतरही अनेक पालक या शाळेत जमले होते. आता या पाच मुलींचे नेमके काय झाले? त्या कुठे गेल्या? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे असेही समजते आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत