कुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी

कर्जत : अजय गायकवाड


कर्जत तलुक्यतील कुशिवली येथील आदिवासीवाडीत नाल्याच्या पुराच्या पाणी आदिवासी लोकांच्या घरात घुसले होते.त्यात आदिवासी शेतकऱ्यांची दोन घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असून त्या घरकुल मध्ये असलेल्या 40 बकऱ्या या मृत झाल्या आहेत.या पूर परिस्थितीची पाहणी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी कुशिवली कातकरी वाडीमध्ये येऊन केली.

22 जुलै रोजी आलेल्या महापुरात वदप ग्रामपंचायत मधील बेघर झालेल्या संकटग्रस्त बाळकृष्ण साबळे यांच्या राहत्या घरासह बकऱ्यांचे राहण्याचे ठिकाण देखील वाहून गेले.त्यात 40 बकऱ्या होत्या, त्या वाहून गेल्याने साबळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले.तर यशवंत व्हला यांच्या घरावर मोठे झाड कोसळले आणि त्यात घर कोसळून ते घर वाहून गेले. त्याचवेळी वेणगाव मधील निलेश ढाकवळ, अशोक हिरवे, जानू व्हला, दशरथ साबळे, मंगेश काळे, जयेश खरात, महादू खरात यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले, तर राहुल खरात यांचा म्हशींचा वाडा वाहत गेला. यासर्व नुकसान ग्रस्त भागांची पाहणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी केली,त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी सहाय्यक गटविकास अधिकारी सी,एच,राठोड वदप ग्रामपंचायतीचे सदस्य लीलाधर गायकवाड, बळीराम देशमुख,विचारे आदी उपस्थित होते.त्याआधी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कुशिवली कातकरी वाडीमध्ये येऊन आदिवासी लोकांना धीर दिला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत