कॅन्सरवरील उपचारानंतर सोनाली बेंद्रे भारतात परतली

नवी दिल्‍ली : रायगड माझा ऑनलाईन 

न्‍यू-यॉर्कमध्‍ये कॅन्‍सरवर उपचार घेतल्‍यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतात परतली आहे. गेल्‍या पाच महिन्यांपासून ती न्यू-यॉर्कमध्ये उपचार घेत होती. सोमवारी रात्री उशीरा ती मुंबई विमानतळावर पोहोचली. परंतु, काही काळ विश्रांती घेतल्‍यानंतर सोनाली पुन्हा न्यू-यॉर्कला उपचारासाठी जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपण लवकरच भारतात येणार असल्याचं सांगितलं होतं. सोनालीने तिला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दिली होती.

पाच महिन्याच्‍या उपचारानंतर मायदेशी परतल्‍यानंतर सोनालीचं स्वागत करण्यासाठी तिचे कुटुंबीय विमानतळावर आले होते. यावेळी चाहत्‍यांची गर्दी झालेली दिसली. विमानतळावर पोहोचल्‍यानंतर सोनालीने सर्वांना हात जोडून अभिवादन केलं.

भारतात पोहोचल्यानंतर सोनालीने इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ‘एकमेकांपासून दूर गेल्यानंतर मनाने आपण अधिक जवळ येतो. मी भारतापासून दूर न्यू-यॉर्कला गेल्यानंतर मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आता मी भारतात, माझ्या मायदेशी आले आहे. त्यामुळे आता मी माझ्या घरी माझ्या हृदयात जाणार आहे,’ असं सोनालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत