कॅन्सरवरील उपचार झाला स्वस्त

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for cancer

कॅन्सरग्रस्त असणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कॅन्सवरील ४२ नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ८ मार्चपासून नव्या किंमती लागू करण्यात येणार आहेत. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) ३०% केले आहे. ट्रेड मार्जिन मधून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सने एक नोटिफिकेशन जारी केले आहे.

व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकारने ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’ च्या पॅरा १९चा वापर केला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील. मात्र या यादीतील औषधांवर ८-१६% ट्रेड मार्जिन लावणे अनिवार्य असणार आहे.

कॅन्सर आणि इतर दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चिक असतात. त्याचबरोबर औषधे देखील महाग असल्यास लोकांना आजारावर उपचार करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत