केंद्रातील मोदींचं ‘हुकूमशाही’ सरकारः राहुल गांधी

नवी दिल्ली  : रायगड माझा वृत्त 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि छत्तीसगडमधील रमन सिंह सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाहीचं सरकार असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. छत्तीसगडमधील मारहाणीचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करीत राहुल गांधी यांनी मोदी-रमन सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांची हुकूमत हीच हुकूमशाही बनली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा बदला येथील जनता घेईल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. बिलासपूरमध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अटल श्रीवास्तव जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नगर विकास मंत्री अमर अग्रवाल यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेछूटपणे लाठीचार्ज केला

.

अमर अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना कचरा म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले होते. पोलिसांनी त्यांचे म्हणने ऐकून न घेताच त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत