केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली : महाराष्ट्र News 24 वृत्त 

केंद्रीय कर्माचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता १७ टक्के होणार असून जवळपास ५० लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली.महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातल्या निवणुका सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता आता १२ टक्क्यांवरून थेट १७ टक्के करण्यात आला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत