केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा लाभ घेण्याचे पालकमंत्री संजय कुटे यांचे आवाहन

बुलढाणा : नितीन कानडजे पाटील

केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे ध्येय्य आपले सर्वांचे आहे. म्हणूनच पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून गॅस जोडणी आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय कुटे यांनी सांगितले.

       

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत खेडेकर,आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह उप जिल्हाधिकारी दुबे,जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे आणि अन्नधान्य वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना गॅस जोडणी आणि रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील लोकांना गॅस जोडणी आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आहे. आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री संजय कुटे यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत