केईम रुग्णालयातील उघडे बाबावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

rashatrawadi
मुंबई : रायगड माझा वृत्त
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या उघडे बाबाच्या दरबारावर कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आरोग्य समितीच्या बैठकीबाहेर आंदोलन करण्यात आले.
परेल येथे महापालिकेचे केईएम रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या परिसरात उघडे बाबा या नावाचा एक व्यक्ती आपला दरबार भरवत असतो. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना या बाबाकडे गेल्यास रुग्ण बरा होईल असे सांगितले जात असल्याने बाबाचा धंदा तेजीत चालला आहे. पालिका सभागृहात बाबावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊनही कारवाई केली जात नसल्याने आज राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षा सुरेना मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान उपस्थित होत्या.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत