केरळमध्ये पार पडत आहे तृतीयपंथीयांची सौंदर्य स्पर्धा

कोच्ची : रायगड  माझा

एक अनोखी सौंदर्य स्पर्धा केरळमध्ये सध्या पार पडत आहे. राज्यात दुसऱ्यांदा ज्यांना समाजात तुच्छतेने लेखले जाते अशा तृतीयपंथीयांच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देशभरातील तृतीय पंथी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

गतवर्षी आयोजित करण्यात आलेली तृतीयपंथीयांची सौंदर्य स्पर्धा चांगली यशस्वी झाली होती. धव्य आर्टर्स अॅण्ड चॅरिटेबल सोसायटीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. अनेकांनी या स्पर्धेचे कौतुक केले होते. यामुळे प्रेरित होऊन पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सौंदर्य स्पर्धा धव्या २०१८ या नावाने आयोजित केली जात आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथीयांना आणणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. सारा शेख ही या सौंदर्य स्पर्धेच्या आयोजनामुळे खूप खुश आहे. दुसरी तृतीय पंथी श्रीमयीने या स्पर्धेमुळे तृतीयपंथीयांमध्ये आत्मविश्वास वाढला असून ते सामाजिक व वैयक्तीकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले. या स्पर्धेला मल्याळम सुपरस्टार मामोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. जयसूर्या, नादिया, रिमा कलिंगल, ममता मोहनदास हे कलाकारदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

१५ जण क्वीन ऑफ धव्या २०१८ साठी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. यामधील एकाची क्वीन म्हणून निवड केली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन सेलिब्रिटी मेकअपमन आणि कलाकार रेंजू रेंजिमर हे करत आहेत. श्याम याची गतवर्षी धव्या २०१८ साठी निवड झाली होती. सरकारने त्याला कंटीन्यूनिंग एज्युकेशन स्कॉलरशिप दिली होती. विविध योजनातून तृतीयपंथीयांचा केरळ सरकार विकास करत आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये तृतीयपंथीयांसाठी क्रीडा महोत्सवही आयोजित करण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत