भिगवण :रायगड माझा
फलटणहून भिगवण येथे नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या विश्वास जाधव यांची पत्नी गर्भवती असलेल्या तिने कैरी खाण्याची इच्छा प्रकट केल्याने विश्वास यांनी दुचाकीहून जाताना बारामती-भिगवण रस्त्या शेजारी असणाऱ्या देवकातेवस्ती वरील शेतातून काही कैऱ्या तोडल्या त्यातून हि घटना घडली
गर्भवती महिलेला कैरी खाण्याची इच्छा झाल्याने पतीने रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने पतीसह गर्भवती पत्नीस चौघांनी लाकडी दांडा आणि कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी (ता. इंदापूर) येथे घडला असून याप्रकरणी भिगवण पोलिसांत चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
विश्वास जाधव व त्यांच्या पत्नीस मारहाण करण्यात आली आहे. तर विठ्ठल गणपत देवकाते, हनुमंत विठ्ठल देवकाते, मनोहर विठ्ठल देवकाते आणि सनी हनुमंत देवकाते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनुमंत व मनोहर देवकाते यांना अटक केली आहे. तर लक्ष्मी मनोज पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटणहून भिगवण येथे नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या विश्वास जाधव यांची पत्नी गर्भवती असलेल्या तिने कैरी खाण्याची इच्छा प्रकट केल्याने विश्वास यांनी दुचाकीहून जाताना बारामती-भिगवण रस्त्या शेजारी असणाऱ्या देवकातेवस्ती वरील शेतातून काही कैऱ्या तोडल्या यावेळी त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक दुसऱ्या दुचाकीवर रस्त्याच्याकडेलाच थांबले होते. दरम्यान, आपल्या झाडाच्या कैऱ्या कोणतीतरी तोडत असल्याची माहिती विठ्ठल देवकाते या शेतकऱ्याला मिळाल्याने ते, त्यांचे दोघे मुले व नातू असे चौघे घटास्थळी येत कैऱ्या तोडल्याचा जाधव दाम्पत्यास जाब विचारीत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तर जाधव यांनी तोडलेल्या कैऱ्यांचे पैसे चुकते करण्याची तयारी दर्शवली असतानाही या चौघांनी जाधव दाम्पत्यास लाकडी दांडे, कुऱ्हाड आणि स्टंपने मारहाण केली, असे फिर्यादित नमूद केल्याने पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला त्यानंतर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी या प्रकरणी तातडीने सूत्रे हलवीत दोघांना अटक केली असून पुढील तपास त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.