कॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदार आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत.

केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कॉंग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत