कॉमेडी क्वीन भारती सिंग रुग्णालयात दाखल

रायगड माझा वृत्त :

Image result for joy bharti singh

कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली विनोदी कलाकार भारती सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीच्या उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर तिच्या पायाला दुखापत झाली होती.

‘खतरों के खिलाडी ९’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारती काही स्टंट करत होती. यावेळी काही स्टंट करताना तिच्या पायाला दुखापत झाली. विशेष म्हणजे दुखापत झाल्यानंतर भारतीने उपचारदेखील घेतले होते. परंतु त्यानंतरही तिचा त्रास वाढत गेला.  या वाढत्या त्रासामुळेच तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ ओढावली आहे. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीने प्रचंड मेहनत घेतली असून तिने तिचं वजनदेखील कमी केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील भारती आणि पती हर्ष लिंबाचिया झळकणार होते. मात्र त्यावेळी या दोघांनाही एकाच वेळी डेंग्यु झाल्याचं निदान डॉक्टरांनी केली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येदेखील तिला सहभागी होता आलं नव्हतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत