कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी BRSP च्या अंजना गायकवाड

कर्जत : रायगड माझा वृत्त 

कर्जत तालुक्यातील कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी BRSPच्या अंजना गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. अंजना गायकवाड यांच्या निवडीमुळे BRSPच्या कार्यकर्त्यांमध्ये आन्दाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान कर्जत तालुक्यातील BRSP च्या शेकडो कार्यकर्त्यांनी अंजना गायकवाड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

या सर्व कार्यासाठी BRSP महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड. सुमित साबळे आणि कर्जत विधानसभा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह कोंदिवडे ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचे मनापासून अंजना गायकवाड यांनी आभार मानलेत. तसेच डॉ सुरेश माने यांच्या नेतृत्वात BRSP व फुले शाहू आंबेडकरी चळवळ कर्जत विधानसभेतील गावगावामध्ये पोहचवण्यामध्ये ऍड.सुमित साबळे आणि सुनील गायकवाड यांचे मोलाचे योगदान केले असल्याचे त्या म्हणाल्यात.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर घारे, BRSP महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड सुमित साबळे, कर्जत विधानसभा अध्यक्ष सुनील गायकवाड,खोपोली नगपरिषदेचे BRSP नगरसेवक सभापती किशोर पानसरे, मधुकर घारे, खालापूर युवा नेतृत्व अमित पवार, खोपोली युवा आघाडी अध्यक्ष प्रफुल्ल मुंढे, कर्जत तालुका युवा अध्यक्ष नितीन सोनावणे, कर्जत विधानसभा उपाध्यक्ष जगदीश शिंदे, कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष अमन गायकवाड, BRVM कर्जत तालुका अध्यक्ष सम्यक सदावर्ते, नेरळ शहर प्रभारी स्वप्नील सदावर्ते, नेरळ शहर उपाध्यक्ष सुशील जाधव, कडाव गावातील अध्यक्ष अमित जाधव, रोहित पवार, राज जाधव, अमर सदावर्ते,रत्नेश जाधव , सागर सदावर्ते, सागर निकाळजे, निखिल ओव्हाळ, विक्की कदम इतर सर्व कार्यकर्ते व महिला उपस्थित होये.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत