कोकणातल्या हापूस आंब्याला मिळाले जीआय मानांकन

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

कोकणातल्या हापूस आंब्याला अखेर जीआय मानांकन मिळालं आहे. जीआयमुळे हापूसच्या मूळ उत्पादनाची जागा, त्याची चव, दर्जा याबद्दलची मान्यता मिळाली असल्याने हापूसला स्वत:ची ओळख मिळाली, असेही म्हणता येईल.

2008 पासून कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र या प्रस्तावाला अनेक हरकती आल्यामुळे कोकणच्या हापूसचे जीआय मानांकन रखडले होते. मात्र 3 ऑक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावानं हापूसला जीआय मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे जीआय प्रमाणपत्र मिळालेला हापूस आंबा 139 वा फळ ठरला आहे.

यापूर्वी 323 जीआय मानांकन प्रमाणपत्र भारत सरकारतर्फे देण्यात आली आहेत. कोकणच्या हापूसचा 324 वा क्रमांक आहे. यापूर्वी आंब्यांमध्ये मराठवाड्याच्या केशर आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे. तर कोकणातील कोकमालाही यापूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. हापूसला जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा हापूसच्या उत्पादकांबरोबरच हापूसच्या खरेदीदारांनाही मिळणार आहे. कोकणातून येणारा हापूस आता जीय मानांकनाच्या लोगोसह बाजारात येण शक्य होणार आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.

भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्‍वासार्हता निर्माण होते.

जीआय मानांकनामुळे होणारे फायदे :

शेतीमालास प्रतिष्ठा | शेतीमालाची नेमकी ओळख | गुणवत्तेची खात्री | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत