कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

माणगाव : रायगड माझा वृत्त 

गौरी-गणपतींचे विसर्जन करून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक निजामपूर-पाली मार्गे वळवण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे गौरींसह सोमवारी विसर्जन झाले. त्यानंतर चाकरमानी मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांचे यामुळे खूप हाल होत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत