कोकणातून राष्ट्रवादीची अनिकेत तटकरेंना उमेदवारी, तटकरेंना निवडणूक कठीण …

स्वाभिमान  लढण्याची शक्यता कमी …

मुंबई: रायगड माझा

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेसाठी माजी मंत्री सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अनिकेत तटकरे उद्या सकाळी आपला अर्ज दाखल करतील. शिवसेनेने राजीव साबळे यांना दोन दिवसापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. राजीव साबळे शिवसेनेकडून आज रत्नागिरीत विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या 21 मे रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होत आहे.

कोकण विधान परिषद निवडणूक भाजप लढवणार नसून भाजपने ही जागा नारायन राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी सोडली आली आहे. मात्र, स्वाभिमानने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष ही निवडणूक लढणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप आणि स्वाभिमान पक्ष शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप व स्वाभिमान पक्षाने शिवसेनेच्या साबळेंना पाठिंबा दिल्यास अनिकेत तटकरे यांना ही निवडणूक जड जाईल हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे या जागेवरुन निवृत्त होत आहेत. आता राष्ट्रवादीने तटकरेंच्या घरात उमेदवारी त्यांच्या मुलाला संधी दिली आहे.

सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीला कंटाळून राजीव साबळे यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश होता. उद्धव ठाकरे यांनी आता तटकरेंच्या विरोधात साबळे यांना मैदानात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

 

शेयर करा

One thought on “कोकणातून राष्ट्रवादीची अनिकेत तटकरेंना उमेदवारी, तटकरेंना निवडणूक कठीण …

  1. पुढील निवडणुकीत २०१९ खासदार निवडणुकीत सुनील तटकरे भाजपमध्ये प्रवेश करणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.