कोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार

सिंधुदुर्ग :रायगड माझा

कोकणचा माणूस प्रेमळ आणि सरळ आहे. पण एखादी गोष्ट त्याला पटली नाही, तर तो कुणाचंही आजिबात ऐकत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांना सावध केले आहे. सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हॉस्पिटलचे उद्धाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.

संपूर्ण कोकणातील अत्याधुनिक अशा लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जेदारच्या सुविधा असलेले लाईफटाईम हॉस्पिटल ८२ एकर परिसरात पसरले आहे. ज्या जनतेने मला मोठे केले त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरिता या हॉस्पिटलचा हा भव्य दिव्य प्रकल्प उभारल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

मोठ्या शहरामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होत नाहीत अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा राणेंनी ग्रामीण भागातील आपल्या जनतेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. राणे हे एक व्हिजन असलेले नेते आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंचे कौतुक केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत