कोकण पदवीधरमध्ये भाजपचा विजय निश्चित!

आमदार प्रशांत ठाकूर यांना विश्वास..!

पनवेल : साहिल रेळेकर

कोकणात भाजपाचे पदवीधर मतदारसंघात काम आहे. यापूर्वी अनेक वेळा भाजप या निवडणुकीत विजयी झाला आहे. आता या मतदारसंघाची पुरेपूर माहिती असलेले निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आल्याने भाजपचा विजय निश्चित असल्याची ग्वाही भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे हेच विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा आत्मविश्वास प्रशांत ठाकुर यांनी व्यक्त केलाय. तसेच शिवसेनेने स्वतंत्र उमेदवारी देऊन ही निवडणूक लढवायला नको हवी नव्हती पण त्यांनी लढवायची ठरवली आहेच तर त्यांना शुभेच्छा असा टोला देखील त्यांनी शिवसेनेला लगावालय. निरंजन डावखरे हे एक अनुभवी उमेदवार आहेत तर त्यांच्या गाठीशी या पूर्वीचा कोकण मतदार संघाचा अनुभव आहे तसेच निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवरील प्रभावामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आव्हानाला प्रतिसाद देऊन निरंजन डावखरे यांना विजयी करतील असा दावा आमदार प्रशांत ठाकुर यांनी केलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत