कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाची बाजी …

चुरशीच्या लढतीमध्ये निरंजन डावखरे यांची शिवसेनेच्या संजय मोरे यांच्यावर  मात 

नवी मुंबई  :  रायगड माझा 

रायगड माझाचे वृत्त पुन्हा एकदा खरे ठरले आहे. भाजपच्या संघटनात्मक बळावर या निवडणुकीत निरंजन डावखरे यांचे पारडे जाड असल्याचे वृत्त रायगड माझाने  प्रसारित केले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. ऐनवेळी पक्षात आलेल्या डावखरेंना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये थोडीसी नाराजी दिसून आली होती. पण भाजपाच्या निकालावर याचा परिणाम झाला नाही. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. कोणत्याही परिस्थितीत डावखरेंचा पराभव करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. अशी सूचक  प्रतिक्रिया निरंजन डावखरेंनी विजयानंतर माध्यमांना दिली. मतमोजणीच्या सुरूवातीला संजय मोरे हे २००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी होते. पहिल्या फेरीत डावखरे हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डाखरेंना १०,३०४ मोरेंना ९,४९४ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना ११,१८० आणि मोरे यांना ८,९९७ मते मिळा

शेवटच्या फेरीत सर्व 12 उमेदवार बाद फेरीत बाद झाल्यावर दुसऱ्या क्रमांकवरील संजय मोरे यांची 24704 मते ट्रान्सफरसाठी घेण्यात आली. त्यातील 2640 मते निरंजन डावखरे यांना मिळाली तर  22064 मते एक्झॉस्ट झाली त्यामुळे निरंजन डावखरे यांच्या मतांचे मूल्य 32831 इतके झाले. विजयासाठी आवश्यक कोटा 35143 इतका आहे, मात्र ते रिंगणात उरलेले एकमेव उमेदवार आहेत. वरील अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी जाहीर केले. आयोगाच्या निर्णयानुसार पहाटे अंतिम निर्णय जाहीर केला  गेला आणि निरंजन डावखरे यांना  विजयी घोषित करण्यात आले. एकूणच कोकणची निवडणूक शिवसेना भाजपा  मध्ये चुरशीची ठरली आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी  खूप मागे राहिली .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत