कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या मतदान

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या (ता. 21) मतदान होणार आहे. कोकणात 941 मतदार आहेत. शिवसेनेचे राजीव साबळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या महाआघाडीचे अनिकेत तटकरेमध्ये थेट लढत आहे. मतदारांना फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी गेली चार दिवस सर्वच पक्षाचे सदस्य अज्ञातवासात आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर सेनेचे राजकीय गणित अवलंबून असले तरी 471 चा मॅजिक आकडा पार करण्यासाठी जोरदार घोडेबाजर सुरू आहे.

रायगड – रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावच्याच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी रायगड जिल्ह्यातील अ‍ॅड. राजीव अशोक साबळे यांना रिंगणात उतरले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हा युवा चेहरा रिंगणात आहे.या निवडणुकीत शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. मतदारांना फोडण्याची राजकीय खेळी सुरू आहे. त्यासाठी मोठमोठे आकडे बाहेर पडत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी सेनेचे जिल्ह्यातील मतदार गोवा सहलीवर नेले आहे. मतदाना दिवशीच त्यांना जिल्ह्यात आणण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत