कोकबन ग्रामपंचायतीची लढार्इ रोहा तालुक्यात प्रतिष्ठेची ठरणार

थेट सरपंच कोणाच्या गटाचा होणार
कोकबनला उध्देश वाडकर का हरीचंद्र वाजंत्रीचे वर्चस्व राहणार

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यात नेहमीच बहुचर्चित ग्रामपंचायत म्हणुन कोकबन ग्रामपंचायतीकडे पाहीले जाते. अलिबाग विधानसभा मतदारसंघात ही ग्रामपंचायत मोडत असुन राष्ट्रवादीचे नेते हरीचंद्र वाजंत्री व शिवसनेचे नेते उध्देश वाडकर या दोन्ही नेत्याना आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी ही ग्रामपंचायत आपल्याकडे राखावे लागेल. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच कोणाच्या गटाचा होणार हे निवडणूकीनंतरचं कळेल.

 

रोहा तालुक्यातील रोहा रेवदंडा मार्गावर ही ग्रामपंचायत येत असुन या ग्रामपंचायतीची थेटसरपंच पदाची निवडणूक पहील्यांदाच होत असल्याने सगळयांचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी मतदान होत असुन स्त्री 1177 तर पुरूष 1232 मतदार असे एकुण 2409 मतदार या उमेदवारांना मतदान करणार आहेत़. या ग्रामपंचायती मध्ये पहील्यांदाच थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. नामाप्र महीला सरपंच पदासाठी आरक्षण असल्याने दिग्गजांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

या ग्रामपंचायती मध्ये प्रभाग 1 मध्ये खारखर्डी संपुर्ण गाव, गोठणवाडी, कोकबन आदीवाशी वाडी मोडत असुन या प्रभागात एकुण 772 मतदार 3 उमेदवार निवडून देणार आहेत.प्रभाग दोन मध्ये दिव संपुर्ण गाव शांताराम चोगले व प्रदिप कोलवणकर, पांडुरंग केमसे व हुसेन मेमन यांचे घराकडील उत्तरेचा बेलखार गावांचा भाग मोडत असुन 791 मतदारांना 3 उमेदवार निवडून द्यायचे आहे.प्रभाग 2 मध्ये उर्वरीत बेलखार गाव, कोकबन संपुर्ण गाव, शिळोशी संपुर्ण गाव मोडतो.846 मतदारांना 3 उमेदवारांना या प्रभागातून निवडून द्यायचे आहेत.

अलिबाग विधानसभा मतदार संघातील या ग्रामपचायतीवर आज राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे.तरी सुध्दा शेकाप व राष्ट्रवादी वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न या वेळी करेल.परंतु शिवसेनेचे विभाग प्रमुख उध्देश वाडकर हे आपली ताकत आजमावणार असल्याने या ग्रामपंचायती मध्ये कोणाची सत्ता येर्इल हे मात्र निवडणुकीच्या निकाली अंतीच कळेल. जिल्हयात राष्ट्रवादी व शेकाप आघाडी आहे.या ग्रामपंचायती मध्ये ही आघाडी कायम राहील का हे नामनिर्दश पत्र मागे घेण्याच्या तारखे नंतरच कळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत