कोणालाही घाबरून मागे हटणाऱ्यांपैकी  आम्ही नाही : नौशाद दळवी   

मुरुड : अमूलकुमार जैन  

आम्ही खऱ्या हाडाचे शिवसैनिक आहोत.शिवसैनिक हे वाघाची औलाद असल्याने आम्ही कोणालाही घाबरून मागे हटनाऱ्या पैकीं नाही आहोत,असे प्रतिपादन बोर्ली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच नौशाद दळवी यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी बोर्ली येथे आयोजित सभेत केले.
उपसरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी जो प्रकार केला आहे तो गलिच्छ होता.ह्या प्रकरणात एका निष्पाप गोरगरीब नागरिकाला मारहाण करण्यात आली तेव्हा पोलीस कर्मचारी हे बघ्याची भूमिका घेतली.याबाबत त्या अधिकारी कर्मचारी यांची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार आहे.शासनाच्या अध्यादेशानुसार मी थेट जनतेतून निवडून आलो असल्याने विरोधकांची गोची झाली आहे.विरोधकांनी ग्रामपंचायत मध्ये केलेला भ्रष्टाचार उघड होईल म्हणून यांनी मला सरपंचच्या खुर्चीवर बसू नये यासाठी विविध प्रकारे आडकाठी करण्याचा प्रयत्न केला.मात्र शेवटी सत्तेचा विजय होऊन निर्णय आमच्या बाजूने लागला आहे.विरोधकांनी नेहमी दादागिरी केली आहे.दादागिरी ही काय असते याची प्रचिती आम्हा शिवसैनिकांना असल्याचे मत नौशाद दळवी यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले की,सरपंचपदाची निवडणूक ही पूर्वीसारखी राहिली नाही.शासनाच्या थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा अधिकार जनतेला प्राप्त झाल्याने जनतेला बदल होणे गरजेचे होते. म्हणून जनतेने शिवसेनेचे नौशाद दळवी यांना सरपंच म्हणून निवडून दिले आहे.दळवी याना प्रशासनाची जाण चांगली असल्याने ते लोकाभिमुख कार्यभार करीत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील असाही विश्वास यावेळी व्यक्त केला.शिवसैनिक हे वाघ आहेत.आमच्या अंगावर आले तर त्यांना सिंगावर घेतले जाईल हेही ध्याण्यात ठेवावे.जनतेची कामे ही झाली पाहिजे त्यासाठी आवश्यक निधी आणला जाईल.ग्रामपंचायत कार्यलाय हे सुसज्ज असे कार्यलाय होण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.
माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी सांगितले की सच्चा शिवसैनिक कसा असतो याचे मूर्तीमत उदाहरण म्हणजे नौशाद दळवी हे होय.वादाने कोणतीही गोष्ट होत नाही.शेकापला फक्त वाद आणि दादागिरी करण्याचे माहीत आहे.नौशाद दळवी हे एका वर्षात परिवर्तन घडवून आणतील. बोर्ली ही वादाची पंचायत म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.विरोधकांनी वादविवाद न करता विचारांची देवाणघेवाण करावी.जनतेनी नौशाद दळवी यांच्यावर सरपंच म्हणून जो विश्वास टाकला आहे त्याला ते तडा जाऊ देणार नाही अशीही ग्वाही यावेळी दळवी यांनी दिली.
यावेळी माजी तालुका प्रमुख भगीरथ पाटील,जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ,बोर्ली मांडला मच्छिमार सोसायटीचे माजी अध्यक्ष चेतन भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सूत्रसंचालन अजय सोडेकर, जोगेंद्र मुजावर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायण मुंबईकर, काँग्रेसचे अजगर दळवी,सुरेश पालवणकर, सतेज ठाकूर,बुंदके आदी मान्यवर उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.