कोरेगाव-भीमा प्रकरणी पाचही जणांची नजरकैद कायम,सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मुंबई : रायगड माझा वृत्त 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी 5 जणांची नजरकैद कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कोरेगाव-भीमा प्रकरणी पाचही जणांची नजरकैद कायम ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. पुढचे 4 आठवडे त्यांना नजरकैद राहणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस तपास कायम ठेवू शकतात असं सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील अटकेत असणाऱ्या 5 सामाजिक कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी एसआयटीने केली होती. पण सुप्रीम कोर्टाने एसआटीची ही मागणी फेटाळली आहे.

अटक करण्यात आलेल्या या पाच जणांच्या अटकेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी इतिहासकार रोमिला थापर यांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाकडून त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे.

वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोंसाल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा हे पाच जण 29 ऑगस्टपासून त्यांच्या त्यांच्या घरात नजरकैदेत आहेत. पण त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात यावी अशी मागणी एसआयटीकडून करण्यात आली पण त्याला सुप्रीम कोर्टाने लाल सिग्नल दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत