कोरोनातून बरे झालेल्या बाधितांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन प्लाझ्मा दान करावा! -विश्वास चंद्रकांत दाते यांनी केले आवाहन

प्लाझ्मा दानात “विश्वास” निर्माण करणारा दाता असावा लागतो. तर “दाते” सारखे प्रामाणिक कार्यकर्ते हे खरे ‘रुग्णसेवक” असतात.!

भांडुप: किशोर गावडे

भांडुप मुंबई महानगरपालिका “एस” विभाग कक्षेतील बरेच कोरोना बाधित रुग्ण आता बरे होऊन घरी गेलेले आहेत. या बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी अॅटीबॉडीज तयार झालेले असतात. अशा बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना बाधितांना जीवदान देऊ शकतात. तर एका प्लाझ्मा दानाने आपण 2 रुग्णांचे प्राण वाचू शकतो. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करा, आणी जीव वाचवा ,असे कळकळीचे आवाहन भांडुप मधील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक, विश्वास दाते यांनी केले आहे.

विश्वास दाते माध्यमांशी बोलताना म्हणाले, प्लाझ्मा मिळवितांना रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होते.मात्र अशावेळी प्रशासनाकडून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची यादीही मिळत नाही. अशावेळी भांडुप पश्चिमेच्या क्रांती नगरातील रुग्णसेवक विश्वास चंद्रकांत दाते यांनी प्लाझ्मा दान मोहीम सुरू केली. आणी केवळ 30 दिवसात 150 हून अधिक रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला.

आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये शरीरातील अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे कोरोनावर लवकर मात केली जाऊ शकते. अँटीबॉडीज अर्थात रोगप्रतिकारशक्‍ती कोरोनाविषाणू ला मारण्यासाठी कार्य करीत असते . ही ऑंटीबॉडी तयार होण्यासाठी उपचारातून बरे झालेल्या बाधितांची रक्तातील प्लाझ्मा महत्त्वाची भूमिका बजावत आहे .रक्तातून प्लाझमा काढून कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन प्लाझमा दान करणे ,ही काळाची गरज असल्याचे मत दाते यांनी व्यक्त केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत