कोरोना काळातही एपीएमसी मार्केट मधील आश्रय शाळा सुरूच; इमारतीत कामगारांचा बेकायदेशीर वास्त्यव्य ?

नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गणली जाते.आणि याठिकाणी रोज मोठी उलाढाल होत असून रोज हजारो ग्राहक इथे येत असतात. मात्र सध्या कोरोनाची महामारी सुरु असताना देखील या मार्केट मधील वाणिज्यिक वापरासाठी असलेल्या गाळे, इमारतीचा रहिवासी वापर सुरूच असल्याचे दिसत आहे.

अत्यंत दाटी वाटीने हे कामगार राहत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात कोरोनाचे केंद्र बिंदू ठरलेल्या एपीएमसी मार्केट मधील कोरोना नियंत्रणाबाबत एपीएमसी प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांचा जो दावा केला जात आहे तो दावा संपूर्ण फोल ठरत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे कोरोना संसर्गाला अधिक खतपाणी मिळत आहे. दरम्यान, एपीएमसी मार्केट मधील कोरोनाच्या उपाययोजना बाबत नुकतेच आमदार गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एपीएमसी मार्केट प्रशासन ही बाब किती गांभीर्याने घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत