कोलाड येथे अनिकेत तटकरे यांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट !

कोलाड : कल्पेश पवार

राज्याचे महसूल मदत व पूर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. चंद्रकांत पाटील हे रायगडात मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आले असता कोलाड येथे त्यांची भेट घेहून आ. अनिकेत तटकरे व जि परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या मार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्याच्या व्यथा मांडुन निवेदन दिले आहे.

कायम रहदारी असणारा मुंबई-गोवा महामार्ग व रायगडातील सर्वच रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशाना रस्ता कमी मात्र खडेच जास्त प्रमाणात दिसत आहे. या पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना आपला नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे हे खड्डे कायमच जीवघेणे ठरत आहेत. त्यातच पुढील काही दिवसांत गणपती उत्सव असल्याने या मार्गावर प्रवाशी वर्गाची संख्या असंख्य असणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचाआणि मुंबई- गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे रायगडात मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथे आले असता, आ.अनिकेत तटकरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी भेट घेऊन या मार्गांची अवस्था व पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रासलेले प्रवाश्याच्या व्यस्था मांडुन त्यांना निवेदन दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत