कोलाड येथे दोघे जण धरणात बुडाले

डिस्कव्हरी कॅमेराच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू

कोलाड: कल्पेश पवार

मे महिन्याच्या सुट्टी ची मज्जा घेण्यासाठी आलेल्या रोहे भुणेस्वर येथील दोघाचा कोलाड कुंडलिका धरणाच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मुत्यु झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली,एकाचा मृत्यू देह साय. 5 वाजता सापडला तर एकाचा फार उशिरा पर्यन्त तपास लागत नसल्याने डिस्कव्हरी कॅमेराच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे . या विषयी मिळालेल्या अधिक माहिती नुसार मे महिन्यांतील सुट्टीची मज्जा घेण्यासाठी रोहे भुनेस्वर येथील सात ते आठ जणांचा समूह पोहण्यासाठी कोलाड ‘डोलवहाल येथील कुंडलिका नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी एक च्या सुमारास आला होता त्यातील कु.महेश विजय बावकर,वय 14 रा. रोहे भुनेस्वर व श्री प्रसाद नरेंद्र राऊत वय 35 रा .ठाणे.यांना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहा सोबत वाहत गेले.त्यातील महेश बाबकर या मुलाचा मृत्युदेह साय 5 वाजता सापडला तर प्रसाद राऊत यांचा तपास लागत नसल्याने व रेस्क्यू ऑरेशन टीम ,व कोलाड राफ्टिंग वाले महेश सानप, यांना पाचारण करण्यात आले,त्यांनी डिस्कव्हरी कॅमेरा,व पाणबुडी यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली आहे . या घटनेची माहिती मिळताच रोहे तहसील सुरेश काशीद, रोहे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, कोलाड पोलीस मंजुषा भोसले व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलिस करित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत