कोल्हापुरात आरक्षणसाठी विद्यार्थी रस्त्यावर

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

Maratha-Kranti-Morcha

 

‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…’ अशी घोषणा देत शालेय विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…’ अशा घोषणा देत त्यांनी सकल मराठा समाजाच्या शौर्यपीठावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन सुरू आहे.

९० टक्के गुण मिळवूनही पाल्यांना प्रवेश मिळत नसल्याने मराठा बांधवांत नाराजी आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय पाल्यांच्या भविष्याला आकार मिळणार नाही, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांबरोबर चौकात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ या घोषणांनी चौक दणाणून गेला.

रक्षाबंधनानिमित्त मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. तसेच, मराठा आरक्षण लवकर मिळावे, ही ओवाळणी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसाद जाधव, राजू जाधव, राहुल इंगवले, किशोर डवंग, महेश कुलकर्णी, शिवराज गायकवाड, संपत पाटील, प्रकाश खामकर, विजय पाटील, बबन सावरे, दादा देसाई, राजू मेवेकरी, काका धर्माधिकारी, ऋतुराज सरनोबत, राज मेवेकरी, यश पवार उपस्थित होते.

भेट देण्याचे उदयनराजेंचे आश्‍वासन 
दरम्यान, समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर शौर्यपीठास भेट देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात जयदीप शेळके, उदय लाड, राजेंद्र चव्हाण, जनार्दन पाटील, शिवाजी लोंढे, अक्षय घाटगे यांचा समावेश होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत