कोल्हापुरात चार अट्टल चोरट्यांचे कोठडीतून पलायन

कोल्हापूर : रायगड माझा

कोल्हापुरात चार अट्टल चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस कोठडीतून धूम ठोकली आहे. पोलिस गाढ झोपेत असताना शाहूवाडी पोलिस स्टेशनमधून चौघांनी लॉकअप कस्टडीचा गज कापून पलायन केले.
कैद्यांच्या पलायनामुळे कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावातील मोबाईल शॉपीमध्ये काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी कळंबा जेलमधून अट्टल चोरटे सुरज दबडे, ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी आणि युवराज कारंडे याना शाहूवाडी पोलिसांनी चौकशीसाठी 16 मे रोजी ताब्यात घेतले होतते. पोलिस गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे या चौघांनी लॉक अपचे गज वाकून पलायन केले. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणाऱ्या शाहूवाडी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

संघटितपणे जबरी चोरी करणारी टोळी म्हणून त्यांच्यावर ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती. मात्र पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे चौघे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सात शोध पथकं रवाना करण्यात आली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत