कोल्हापूरात ‘जुळता जुळता जुळेना’ या आगामी मालिकेच्या सेटवर हल्ला

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

करवीर तालुक्यातील केर्ली गावात ‘जुळता जुळता जुळेना’ या आगामी मालिकेच्या सेटवर हल्ला करत सेटवरील गाड्यांची, शूटिंगच्या साहित्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी या गावच्या उपसरपंचासह ९ जणांना पोलिसांनी केली अटक केली आहे.

गावात मालिकेचं चित्रीकरण करायचं असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी मागणी उपसपंच अमित पाटील यांनी मालिकेचे दिग्‍दर्शक गौतम कोळी यांच्याकडं केली होती. मात्र, दिग्‍दर्शकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं कोळी यांना धक्काबुक्की करत मालिकेच्या सेटवरील सामान तसंच गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

यापूर्वी देखील कोल्हापुरात मालिकांच्या सेटवर गावकऱ्यांकडून तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत