कोल्‍हापूर मधून शिवज्योत आणणार्‍या ट्रकला अपघात, सांगलीचे ५ ठार

(रायगड माझा ऑनलाईन)

शिव जंयतीनिमित्त पन्‍हाळ्यावरून सांगलीला शिवज्योत घेऊन जाणार्‍या ट्रकला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाट्याजवळ पहाटे अपघात झाला. यामध्ये ५ युवकांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात ठार झालेले सांगलीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगितले. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील आंबेडकरनगरजवळ झाला आहे.

अपघातात मृत झालेले विद्यार्थी : सुशांत विजय पाटील, केतन खोचे, अरुण अंबादास बोंडे, प्रवीण शांताराम त्रिलोटकर, सुमीत संजय कुलकर्णी या अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाल्याने कोल्‍हापूर, सांगलीच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील आहेत. सांगलीला जात असताना समोरून येणार्‍या दुचाकीला चुकविताना हा अपघात झाला. महामार्गावरील पुलावरच ट्रक पलटी झाला. या ट्रकखाली पाच विद्यार्थी सापडल्याने त्‍यांचा मृत्‍यू झाला.

पोलिसांनी व आंबेडकरनगरमधील युवकांनी तात्‍काळ जखमींना कोल्‍हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत